तळेगाव | पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
ड्युटी संपवून घरी पायी जात असलेल्या सुरक्षा सुपरवायझरवर अज्ञात व्यक्तीने लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना सुंदवडी गावच्या हद्दीत देहूफाटा परिसरात घडली. या हल्ल्यात सुपरवायझरच्या डोक्यासह चेहऱ्याच्या डाव्या बाजूला गंभीर दुखापत झाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरजित श्रीहरीराम कुमार (वय ३२) हे सुरक्षा सुपरवायझर म्हणून काम करतात. ५ ऑगस्ट रोजी सकाळी सातच्या सुमारास ते ड्युटी संपवून खालुंब्रे येथे राहत्या ठिकाणी रस्त्याच्या कडेने पायी जात होते.
यावेळी अचानक एक अज्ञात व्यक्ती त्यांच्या समोर आला आणि त्याने लोखंडी रॉडने अमरजित यांच्या डोक्यात व चेहऱ्याच्या डाव्या बाजूला मारहाण केली. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.
या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१) अन्वये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचे वय अंदाजे ३० वर्षे असून तो सावळ्या रंगाचा, सुमारे पाच फूट सहा इंच उंचीचा आणि विटकरी रंगाचा टी-शर्ट व हाफ पॅन्ट परिधान केलेला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांकडून हल्लेखोराचा शोध सुरू असून, पुढील तपास पोलीस हवालदार भोजणे करीत आहेत.




Total Users : 226405