spot_img
spot_img
spot_img
spot_img

निगडीत भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू

निगडी | पिंपरी चिंचवड प्रतिनिधी

निगडीतील त्रिवेणीनगर चौकात भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात २४ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना १ ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजीत श्रीशेल कुंचबळ (वय २४) हे मोटारसायकल एमएच १४ डीके ७७६६ वरून तळवडे येथून साईनाथनगर, निगडी येथील घरी जात होते. त्रिवेणीनगर चौकातील पोलीस चौकीसमोरून जात असताना पाठीमागून आलेल्या एमएच ०६ बीडी ०७१४ क्रमांकाच्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

धडकेनंतर अभिजीत दुचाकीसह रस्त्यावर कोसळले आणि ट्रकखाली आल्याने ट्रकचे चाक त्यांच्या पोटाला व बरगड्यांना लागले. या दुर्घटनेत त्यांच्या पोटातील आतड्यांना व बरगड्यांना गंभीर दुखापत झाली. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

ट्रक चालकाने वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवून अपघात केल्याचा आरोप असून, अपघातानंतर चालक घटनास्थळावरून निघून गेल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६(१), २८१, १२५(ब) तसेच मोटार वाहन कायद्याच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात ट्रकचालकाचा शोध सुरू असून, पुढील तपास परि. पोउपनि. साबळे करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!