spot_img
spot_img
spot_img
spot_img

डी-मार्टमध्ये ७ हजारांचा माल लंपास करण्याचा प्रयत्न; पिता-पुत्र ताब्यात

चिंचवड | पिंपरी चिंचवड प्रतिनिधी

चिंचवड येथील डी-मार्ट मॉलमध्ये खरेदीच्या बहाण्याने सुमारे ७ हजार ४०३ रुपयांचा माल चोरी करून नेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पिता-पुत्राविरोधात संत तुकारामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन वसंत वाघमारे (वय ४५) आणि आयुष सचिन वाघमारे (वय १८ वर्षे ६ महिने) हे ६ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठच्या सुमारास डी-मार्ट मॉलमध्ये खरेदीसाठी आले होते.

यावेळी त्यांनी खरेदी केलेल्या मालाव्यतिरिक्त ९ डिओ परफ्यूम, दोन जोड बूट, सहा जोड कपडे, दोन अंडरवेअर आणि एक पेन सेट, असा एकूण ७,४०३ रुपये किमतीचा माल चोरीच्या उद्देशाने घेऊन जात असताना त्यांना पकडण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

याप्रकरणी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनि. पवार करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!