spot_img
spot_img
spot_img
spot_img

वराळेत बेकायदा गॅस रिफिलिंगचा पर्दाफाश; १५.५२ लाखांचा मुद्देमाल जप्त

वराळे | पिंपरी चिंचवड प्रतिनिधी

वराळे गावच्या हद्दीत घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरमधून बेकायदेशीरपणे गॅस रिफिलिंग करून विक्री करण्याचा प्रकार तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला. या कारवाईत सुमारे १५ लाख ५२ हजार २०० रुपये किमतीचे गॅस सिलेंडर व मारुती सुझुकी कंपनीचा टेम्पो असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, सात जणांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ ऑगस्ट रोजी दुपारी १२.४० वाजता वराळे येथील तळेगाव दाभाडे-वराळे रोडवरील साईसृष्टी सोसायटीजवळ कुणाल भारत गॅस एजन्सीच्या गोदामासमोर ही कारवाई करण्यात आली.

आरोपींना गॅस सिलेंडर हा ज्वलनशील पदार्थ असून, बेकायदेशीर रिफिलिंगमुळे परिसरातील नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, याची जाणीव असूनही त्यांनी कोणतीही परवानगी न घेता घरगुती व व्यावसायिक सिलेंडरमधून गॅस रिफिलिंग करून विक्री करण्याच्या उद्देशाने सिलेंडर व टेम्पो ताब्यात ठेवल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

या प्रकरणी मदन भिकमसिंग ठाकर (३५), देवेंद्र हरिओम ठाकूर (२६), सुनील प्रकाश इंगळे (३०), सुनील मल्लीकअर्जुन पुजारी (२८), सुरज उमाकांत मासाळे (२२), रमेश व्यंकट रेड्डी (३९) आणि अशोक मेहराजराम कुमार या सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम २८७, २८८, ३(५) तसेच जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ मधील कलम ३ व ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि. मोहिते करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!