spot_img
spot_img
spot_img
spot_img

म्हाळुंगेत एमडी-अफीमसह आरोपी जेरबंद; १.२१ लाखांचा मुद्देमाल जप्त

म्हाळुंगे | पिंपरी चिंचवड प्रतिनिधी

म्हाळुंगे परिसरात अंमली पदार्थांची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या एका व्यक्तीला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने पकडले. त्याच्याकडून एमडी (मेफेड्रॉन) व अफीमसह एकूण १ लाख २१ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ ऑगस्ट रोजी दुपारी ३.५१ वाजता म्हाळुंगे येथील द्वारका सेक्टर-१ ए रोडलगत मयूर इंडस्ट्रियल अँड हार्डवेअर दुकानासमोर ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी रमेश मानाराम चौधरी (वय ३८, रा. द्वारका सिटी, म्हाळुंगे; मूळ राजस्थान) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २५ हजार ७०० रुपये किमतीचे २.५७ ग्रॅम एमडी (मेफेड्रॉन), ४६ हजार रुपये किमतीचे ९२ ग्रॅम अफीम आणि ५० हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

चौधरी याने अफीम व एमडी हे अंमली पदार्थ राजस्थानातील एका व्यक्तीकडून मिळाल्याचे, तसेच एमडी पुढे अन्य व्यक्तीकडून आणल्याचे पोलिसांना सांगितल्याचे तक्रारीत नमूद आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

याप्रकरणी उत्तर म्हाळुंगे पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क), १५(अ), २२(अ), २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि. कल्याण घाडगे करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!