spot_img
spot_img
spot_img
spot_img

जुन्या भांडणातून तरुणावर सिमेंट ब्लॉकने हल्ला; बुलेटचीही तोडफोड

प्रतिनिधी | युनूस खतीब

जुन्या भांडणाचा राग मनात धरून तरुणाला शिवीगाळ करत सिमेंट ब्लॉकने मारहाण केल्याची तसेच त्याच्या बुलेट दुचाकीची हत्यार व दगडाने तोडफोड केल्याची घटना कासारवाडीतील गुलीस्ताननगर परिसरात घडली. यावेळी मुलाला वाचविण्यासाठी आलेल्या त्याच्या आईलाही धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप आहे.

अरबाज कुरेशी, तरुण (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) आणि त्यांच्या दोन अनोळखी साथीदारांविरोधात दापोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरबाज ताज शेख (वय २४, व्यवसाय फॅब्रिकेशन, रा. गुलीस्ताननगर, कासारवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, ३ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठच्या सुमारास फिर्यादी घरासमोर बुलेटवर बसून मोबाईलमध्ये लुडो गेम खेळत होते. त्यावेळी आरोपी तेथे आले. जुन्या भांडणाच्या कारणावरून त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ करत सिमेंट ब्लॉकने मारहाण केल्याचा आरोप आहे.

त्यानंतर आरोपींनी बुलेट दुचाकीवर हत्यार व दगडाने मारून नुकसान केले. हा प्रकार पाहून फिर्यादीच्या आईने विरोध केला असता, दोन अनोळखी आरोपींपैकी एकाने त्यांना धक्काबुक्की केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

याप्रकरणी दापोडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २०२/२०२६ भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार पवार करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!