प्रतिनिधी | युनूस खतीब
मोशी येथील अॅकॉर्ड हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये उभी केलेली सुमारे ३५ हजार रुपये किमतीची होंडा ॲक्टिव्हा अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिद्धार्थ विठ्ठल गायकवाड (वय ३५, रा. किनईगाव, देहूरोड, पुणे) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, गायकवाड यांनी ३ ऑगस्ट रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास त्यांची पिवळ्या रंगाची होंडा ॲक्टिव्हा मोशीतील अॅकॉर्ड हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये उभी केली होती. रात्री साडेआठच्या सुमारास वाहन तेथे आढळून आले नाही. अज्ञात चोरट्याने आर्थिक फायद्याच्या उद्देशाने ॲक्टिव्हा चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात बीएनएस कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस नाईक सानप करीत आहेत.



