spot_img
spot_img
spot_img
spot_img

भोसरीत घरातून गावठी कट्टा अन् जिवंत काडतूस जप्त

प्रतिनिधी | युनूस खतीब

भोसरीतील चक्रपाणी वसाहतीत एका व्यक्तीच्या घरातून विनापरवाना बेकायदेशीररीत्या बाळगलेला गावठी बनावटी कट्टा आणि जिवंत काडतूस पोलिसांनी जप्त केले. मंगळवार (दि. ४) मध्यरात्रीनंतर ही कारवाई करण्यात आली.

याप्रकरणी संजय दादाभाऊ माने (वय ४४, रा. पांडवनगर, चक्रपाणी वसाहत, भोसरी) याच्याविरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कॉन्स्टेबल प्रभाकर हनुमंत खाडे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, ४ ऑगस्ट रोजी रात्री दीड ते अडीचच्या दरम्यान पांडवनगर गल्ली क्रमांक २ येथील माने याच्या राहत्या घरात पोलिसांनी कारवाई केली. त्याच्याकडे ४० हजार रुपये किमतीचा लाकडी मूठ असलेला बनावटी कट्टा, पाच हजार रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस आणि १० हजार रुपये किमतीचा रेडमी कंपनीचा मोबाईल, असा एकूण ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला.

संबंधित शस्त्र विनापरवाना बाळगल्याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खाडे करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!