spot_img
spot_img
spot_img
spot_img

लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) पक्षाच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी सुंदर कांबळे यांची नियुक्ती

शबनम न्यूज | प्रतिनिधी

लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रमोद एम. कुदळे यांनी सुंदर कांबळे यांची पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. नियुक्तीपत्रानुसार ही नियुक्ती 26 मे 2026 रोजी करण्यात आली असून, पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि शहरात पक्षाचा विस्तार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

नियुक्तीपत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीने आणि स्वर्गीय रामविलास पासवान यांच्या प्रेरणेने पक्ष संघटना बळकट करण्यासाठी तन-मन-धनाने कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच सुंदर कांबळे यांनी पक्ष नेतृत्वाचा विश्वास सार्थ ठरवत पिंपरी-चिंचवडमध्ये लोक जनशक्ती पार्टीचे संघटन वाढवावे, अशा शुभेच्छाही प्रदेशाध्यक्ष प्रमोद कुदळे यांनी दिल्या आहेत.

सुंदर कांबळे यांच्या नियुक्तीमुळे पिंपरी-चिंचवडमधील पक्षाच्या संघटनात्मक कामाला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!