शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या नेतृत्वात भारतीय काँग्रेस पक्षाच्या जाहीर निषेध करण्यात आला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांच्या बेताल वक्तव्याचा तसेच पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर जे आक्षेपार्ह विधान केलेले आहे, त्वरित हटवून महाराष्ट्र राज्याच्या उप मुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रावहिनी पवार यांची जाहीर माफी मागावी, अशी प्रमुख मागणी आंदोलनात दरम्यान पक्षाकडून करण्यात आली.
याबद्दल बोलताना शहराध्यक्ष म्हणाले, स्वर्गीय अजितदादांच्या आकाली जाण्याने जे दुःख वहिनी आणि त्यांच्या कुटुंबियांवर कोसळले असताना देखील, केवळ या राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून त्या सक्रिय झाल्या. राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत असताना, महाराष्ट्र काँग्रेसने आज वापरलेली “गुंगी गुडिया” ही भाषा केवळ एका कर्तृत्वान महिला नेत्याचा अपमान नाही, तर प्रत्येक कर्तृत्ववान महिलेच्या सन्मानाचा अपमान आहे. ज्या पक्षाच्या इतिहासात इंदिरा गांधींसारख्या मोठ्या नेत्या अशाच शब्दांनी हिणवल्या गेल्या, त्याच पक्षाने आज पुन्हा तीच चूक केली आहे. महिला सन्मानाच्या घोषणा देण्यापेक्षा स्वतःच्या शब्दांत आणि कृतीमधे तो सन्मान दिसला पाहिजे. शिव, शाहू, फुले, आंबेडकर आणि स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात महिलांचा अवमान करणारी भाषा कधीच स्वीकारली जाणार नाही. राजकारणात मतभेद असू शकतात, पण महिलांचा अपमान कधीच असू शकत नाही. महाराष्ट्र काँग्रेसने याबद्दल जाहीर माफी मागावी. अशी मागणी आंदोलकर्त्यांच्यावतीने शहराध्यक्ष बहल यांनी केली.
यावेळी शहराध्यक्ष योगेश बहल, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, विठ्ठल उर्फ नाना काटे, मा.स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, मा.महापौर तथा नगरसेविका वैशाली घोडेकर, महिला अध्यक्ष कविता आल्हाट, कार्याध्यक्ष राहुल भोसले, फजल शेख, शाम लांडे, सारंग कामतेकर, युवक अध्यक्ष शेखर काटे,नगरसेविका तथा युवती अध्यक्ष वर्षा जगताप, नगरसेविका , वैशाली काळभोर, स्वाती उर्फ माई काटे, माया बारणे, अरुणा लंगोटे, प्रतीक्षा लांगी जवळकर, निकिता कदम, दीप्ती कांबळे, उज्वला ढोरे, योगिता बारणे, शमीम पठाण, प्रियांका कुदळे, भोसरी विधानसभा अध्यक्ष पंकज भालेकर, राजेंद्र जगताप, नगरसेवक जितेंद्र ननावरे विराज लांडे, शेखर चिंचवडे, प्रमोद कुटे, सागर कोकणे, राजू बनसोडे, सारीका मासूळकर, यश साने, तुषार सहाने, प्रदेश उपाध्यक्ष ॲड.गोरक्ष लोखंडे, अँड सचिन आवटे, ज्ञानेश्वर कांबळे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष कैलास बारणे, संघटक सतीश दरेकर, भोसरी विधानसभा प्रकाश सोमवंशी, माजी नगरसेवक बन्सी पारडे, शेरबहादुर उर्फ मायला खत्री, आशा शेडगे, सामाजिक न्याय सेल अध्यक्ष संजय औसरमल, झोपडपट्टी सेल अध्यक्ष रवींद्र ओव्हाळ, खजिनदार दीपक साकोरे, उद्योग व्यापार सेल अध्यक्ष श्रीकांत कदम, अल्पसंख्याक अध्यक्ष युसुफ कुरेशी, अध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ माऊली मोरे, ख्रिश्चन सेल अध्यक्ष सुनील जाधव, अर्बन सेल अध्यक्ष प्रदीप गायकवाड, मनीषा गटकळ, चिंचवड विधानसभा महिला अध्यक्ष संगीता कोकणे, महिला वरिष्ठ कार्याध्यक्ष कविता खराडे, भोसरी विधानसभा महिला अध्यक्ष पूनम वाघ, महिला पदाधिकारी विजया काटे, अश्विनी तापकीर, मीरा कुदळे, विजया काटे, देवी थोरात, मेधा पळशीकर,आशा मराठे, शितल महाजन, कोमल कवडे, नीलम कदम, शहर पदाधिकारी शक्रूल्ला पठाण, प्रवीण पिंजन, विशाल काळभोर, अकबर मुल्ला, बापू सोनवणे, बाबासाहेब चौधरी, कुमार कांबळे, रमजान सय्यद, विशाल मासुळकर, गणेश लंगोटे, अरुण पवार, तुषार ताम्हणे, डॅनियल दळवी, सचिन गायकवाड, मंगेश बारणे, दत्तात्रय जगताप, संपत पाचुंदकर, चंद्रम हलगी, चंद्रकांत तापकीर, अर्जुन कदम रवी खत्री, रूपेश खत्री, अनिल वाघमारे, दिपक गोरे इत्यादी सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.



