शबनम न्यूज | प्रतिनिधी
हिंजवडी परिसरातील कासारसाई येथे घरासमोर उभी केलेली हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ जुलै रोजी रात्री ८ ते २९ जुलै रोजी सकाळी ६ या कालावधीत विनायक टेमगिरे यांच्या घरासमोर उभी असलेली फिर्यादी आनंद सोमनाथ करडे (वय ३०, व्यवसाय चालक) यांची हिरो होंडा स्प्लेंडर (क्रमांक एमएच १२ डीसी १५८६) ही दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली.
दुचाकी आढळून न आल्याने फिर्यादीने हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.




Total Users : 226788