spot_img
spot_img
spot_img
spot_img

उद्योजक अरुण चाबुकस्वार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

शबनम न्यूज | प्रतिनिधी

न्यू सिटी प्राईड इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक अरुण चाबुकस्वार यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेत विविध कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा रांगोळी स्पर्धा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतून विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.

 संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली. यावेळी “भगवान बुद्धांनी दिलेली प्रज्ञा, करुणा आणि समता ही त्रिसूत्री तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा प्रेरणादायी संदेश अरुण चाबुकस्वार सर यांनी दिला.  यावेळी संकल्प पुष्प माला अर्पण समितीचे सदस्य उपस्थित होते. त्यानंतर शाळेतील मुली व शिक्षिका यांनी औक्षण केले. तसेच प्रत्येक क्लासच्या विद्यार्थ्यांनी वर्गामध्ये केक कापून स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना खाऊ वाटप कार्यक्रम करण्यात आला.

यावेळी माननीय. आमदार शंकर भाऊ जगताप, मा.  आमदार  अश्विनी ताई जगताप, मा. विरोधी पक्षनेते  विठ्ठल (नाना)  काटे, भाजपा पिंपरी चिंचवड अध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे, नगरसेवक सागर कोकणे, सामाजिक कार्यकर्ते  जितेश जगताप,  बाळासाहेब शेंडगे, भाऊसाहेब गर्जे,  तात्या शिंनगारे, निलेश भिसे, सिद्धार्थ गायकवाड, हर्षवर्धन कांबळे, प्रमोद गायकवाड, किरण लोंढे,  कुणाल साठे,  सुनंदा गायकवाड, शाळेचे उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!