पहिल्या टप्प्यात ६००, तर दुसऱ्या टप्प्यात ८००; एकूण १,४०० नागरिकांना लाभ
शबनम न्यूज | प्रतिनिधी
नागरिकांना आधुनिक, सुलभ आणि डिजिटल सार्वजनिक वाहतूक सुविधांचा लाभ मिळावा या उद्देशाने नगरसेविका डॉ. सौ. कुंदाताई संजय भिसे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या मोफत NCMC (National Common Mobility Card) कार्ड वाटप शिबिराच्या दुसऱ्या टप्प्यात तब्बल ८०० नागरिकांना NCMC कार्डांचे वितरण करण्यात आले.
यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यात ६०० नागरिकांना NCMC कार्डांचे वाटप करण्यात आले होते. त्यामुळे दोन्ही टप्प्यांमध्ये मिळून एकूण १,४०० नागरिकांना या सुविधेचा लाभ मिळाला आहे. नागरिकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे हे शिबिर अत्यंत यशस्वी ठरले.
NCMC (National Common Mobility Card) हे ‘वन नेशन, वन कार्ड’ या संकल्पनेवर आधारित असून, या कार्डाच्या माध्यमातून मेट्रो, बस तसेच भविष्यात विविध सार्वजनिक वाहतूक सेवांमध्ये एकाच कार्डाचा वापर करता येणार आहे. डिजिटल व्यवहारांना चालना मिळण्यासोबतच नागरिकांचा वेळ वाचणार असून तिकीट काढण्यासाठी रांगेत उभे राहण्याची गरज कमी होणार आहे. रोख व्यवहारांवरील अवलंबित्व कमी होऊन सुरक्षित, पारदर्शक आणि सुलभ प्रवासाचा अनुभव नागरिकांना मिळणार आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या डिजिटल इंडिया उपक्रमाला बळ देणारे हे कार्ड भविष्यातील स्मार्ट नागरी जीवनाचा महत्त्वाचा भाग ठरणार आहे.
शिबिरामध्ये पात्र लाभार्थ्यांना नियोजनबद्ध पद्धतीने कार्डांचे वितरण करण्यात आले. संपूर्ण प्रक्रिया सुरळीत व शिस्तबद्ध पार पडल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी नगरसेविका डॉ. सौ. कुंदाताई संजय भिसे म्हणाल्या, “नागरिकांना शासनाच्या आधुनिक आणि डिजिटल सुविधांचा लाभ घराजवळ उपलब्ध करून देणे, हीच आमची प्राथमिकता आहे. पहिल्या टप्प्यात ६०० आणि दुसऱ्या टप्प्यात ८०० अशा एकूण १,४०० नागरिकांना NCMC कार्डांचे वितरण करण्यात आले आहे. नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ सहज आणि विनाअडथळा मिळावा यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. भविष्यातही नागरिकांच्या हिताचे आणि त्यांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणारे उपक्रम राबवत राहू.”
नागरिकांच्या प्रश्नांवर तत्परतेने काम करत त्यांना शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी नगरसेविका डॉ. सौ. कुंदाताई संजय भिसे सातत्याने पुढाकार घेत असून, अशा लोकाभिमुख उपक्रमांमुळे परिसरातील नागरिकांकडून त्यांच्या कार्याचे स्वागत होत आहे.



