spot_img
spot_img
spot_img
spot_img

अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्य वाटप आणि व्याख्यानाचे आयोजन

शबनम न्यूज | प्रतिनिधी

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त गुरुवार पेठ पंच हौद येथे सेंट हेल्डाज हायस्कूल मुलींच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी क्रीडा साहित्य वाटप आणि अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर व्याख्यान आयोजन करण्यात आले होते
याचे आयोजन शिवसेना शिक्षक शिक्षकेतर संघाचे पुणे शहर जिल्हा अध्यक्ष अनिल गडकरी सर यांनी केले होते. यावेळी विद्यार्थ्यांना लेझीम खेळण्याचे साहित्य. फुटबॉल. आणि व्हॉलीबॉल आदि साहित्य देण्यात आले. मॉर्डन गर्ल्स हायस्कूलच्या उप मुख्याध्यापिका डॉ.उज्वला मोरे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्रवर व्याख्यान सादर केले तसेच भारतरत्न देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका अपर्णा जाधव, शिवसेना पुणे शहर महिला आघाडी सहसंपर्कप्रमुख सुदर्शनाताई त्रिगुणाईत, सनी स्पोर्ट्सचे व्यवस्थापक जयंत भोसले, शिवसेना कसबा विधानसभा प्रमुख निलेश जगताप, अनिल बटाणे, विश्वास दिघे, आदि उपस्थित होते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!