spot_img
spot_img
spot_img
spot_img

पैशांच्या वादातून तरुणाला बेदम मारहाण; तिघांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा

 

इंद्रायणीनगर क्रीडा संकुलातील घटना; एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात

पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी : पैशांच्या वादातून एका तरुणाला ‘याला जिवंत सोडायचे नाही’ असे म्हणत तिघांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना भोसरीतील इंद्रायणीनगर क्रीडा संकुलाच्या मैदानावर घडली. मारहाणीत संदीप डोळस गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पोटात रक्तस्राव झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

ही घटना शनिवारी (दि. १ ऑगस्ट) सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी संदीप यांच्या पत्नी दीपाली संदीप डोळस (वय ३३, रा. दिघी रोड, भोसरी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी अनिल सुभाष लांडे (वय ४१), बापू साहेबराव अहिवळे (वय ४५) आणि राजन जयचंद जिनवाल (वय ४८) यांच्याविरोधात बीएनएस कलम १०९, ३(५) अन्वये खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. यातील जिनवाल पोलिसांच्या ताब्यात असून अटकेची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांच्या माहितीनुसार, पैशांच्या कारणावरून संदीप यांच्याशी आरोपींचा वाद झाला. त्यावेळी ‘याला जिवंत सोडायचे नाही’ असे म्हणत तिघांनी संदीप यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत त्यांच्या पोटात रक्तस्राव झाला असून कंबरेखालीही दुखापत झाली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तळेकर करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!