spot_img
spot_img
spot_img
spot_img

आळंदी भाजी मंडईतून ॲक्टिव्हाची चोरी

हँडल लॉक करून उभी केलेली ३० हजारांची दुचाकी चोरट्याने पळवली

पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी : आळंदीतील भाजी मंडई परिसरात हँडल लॉक करून पार्क केलेली ३० हजार रुपये किमतीची होंडा ॲक्टिव्हा अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे.

याप्रकरणी अनिलकुमार नथुनी सिंह (वय ५३, रा. गव्हाणे वस्ती, भोसरी) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी २५ जुलै २०२५ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास आळंदी भाजी मंडईतील चेतन प्रिंटिंग प्रेसजवळील रस्त्यावर त्यांची ग्रे रंगाची ॲक्टिव्हा डिलक्स (एमएच १४ सीएन २५६१) हँडल लॉक करून पार्क केली होती. अवघ्या काही वेळात अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली.

विशेष म्हणजे, चोरीची घटना जुलै २०२५ मधील असून याप्रकरणी १ ऑगस्ट २०२६ रोजी, म्हणजेच जवळपास वर्षभरानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जाधव करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!