spot_img
spot_img
spot_img
spot_img

मोशी बाजार समितीत ‘टाटा सॉल्ट’च्या नावाने बनावट मिठाचा साठा?

दुकानावर कारवाई; व्यापाऱ्याविरोधात कॉपीराईट कायद्यान्वये गुन्हा

पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी : नामांकित टाटा सॉल्टच्या नावाचा वापर करून कथित बनावट मीठ विक्रीसाठी ठेवल्याचा प्रकार मोशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एका व्यापाऱ्याविरोधात कॉपीराईट कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोपाल प्रभुरामजी प्रजापत (वय २८, रा. मोशी) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. कृष्णा देवीप्रसाद कनोजीया (वय ५०, रा. मालाड, मुंबई) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

पोलिसांच्या माहितीनुसार, शनिवारी (दि. १) दुपारी दोनच्या सुमारास मोशी कृषी उत्पन्न बाजार समितीमधील तुलशी ट्रेडिंग, शॉप क्रमांक १८ येथे हा प्रकार आढळून आला. दुकानात टाटा सॉल्टच्या नावाने कथित बनावट मीठ स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विक्रीच्या उद्देशाने ठेवण्यात आल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

या प्रकारामुळे संबंधित कंपनीच्या स्वामित्व हक्काचा भंग झाल्याचा आरोप असून भोसरी एमआयडीसी पोलिसांनी कॉपीराईट कायद्याच्या कलम ५१ आणि ६३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!