spot_img
spot_img
spot_img
spot_img

राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) युवक प्रदेशाध्यक्षपदी विशाल वाकडकर यांची नियुक्ती

शबनम न्यूज | प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्षपदी पिंपरी-चिंचवड शहरातील युवा नेते विशाल वाकडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे प्रमुख उपस्थित होत्या.

विशाल वाकडकर हे अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात सक्रिय असून त्यांनी यापूर्वी पिंपरी-चिंचवड शहर युवक अध्यक्ष म्हणूनही प्रभावी कामगिरी बजावली आहे. संघटन कौशल्य, युवकांमधील जनसंपर्क आणि पक्षविस्तारासाठी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

त्यांच्या नियुक्तीनंतर राज्यभरातील युवकांना सक्षम आणि सक्रिय नेतृत्व मिळाल्याची भावना पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत असून, युवक संघटना अधिक बळकट करण्यासाठी वाकडकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात व्यापक काम होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!