spot_img
spot_img
spot_img
spot_img

आमदार शंकर जगताप यांच्या सूचनेनंतर पुनावळे-काटेवस्ती मार्गावर डिव्हायडरच्या कामाला सुरुवात

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पुनावळे भुयारी मार्ग ते काटेवस्ती दरम्यानच्या मुख्य सिमेंट काँक्रीट रस्त्यावर वाहतुकीची सुरक्षितता वाढविण्यासाठी मध्यभागी डिव्हायडर उभारण्याच्या कामाला पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने प्रत्यक्ष सुरुवात केली आहे. आमदार शंकर जगताप यांच्या सूचनेनंतर या कामाला गती मिळाली आहे.

मागील आठवड्यात विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमानिमित्त पुनावळे परिसराच्या दौऱ्यावर असताना आमदार शंकर जगताप यांनी पुनावळे भुयारी मार्ग ते काटेवस्तीकडे जाणाऱ्या मुख्य सिमेंट काँक्रीट रस्त्याची पाहणी केली होती. यावेळी रस्त्याची गुणवत्ता समाधानकारक असल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र, संपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर दोन्ही बाजूंनी वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे अपघाताची शक्यता वाढत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रस्त्याच्या मध्यभागी तातडीने डिव्हायडर उभारण्याची आवश्यकता असल्याचे सांगत त्यांनी या संदर्भात महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याच्या सूचना भाजपचे शहर जिल्हा सचिव नवनाथ मारुती ढवळे यांना दिल्या.

आमदारांच्या सूचनेनुसार नवनाथ ढवळे यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागाशी संपर्क साधून पत्राद्वारे डिव्हायडर उभारण्याची मागणी केली. नागरिकांच्या हिताचा विचार करून हे काम तातडीने हाती घ्यावे, अशी विनंती त्यांनी केली होती.

या मागणीची सकारात्मक दखल घेत महापालिकेने कालपासून पुनावळे भुयारी मार्ग ते काटेवस्तीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर डिव्हायडर उभारण्याचे काम सुरू केले आहे. या कामामुळे वाहतुकीला अधिक शिस्त लागण्यास मदत होणार असून समोरासमोर होणाऱ्या अपघातांना आळा बसेल आणि नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या लोकहिताच्या कामासाठी आमदार शंकर जगताप यांच्या दूरदृष्टीपूर्ण सूचनेबद्दल तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने कार्यवाही केल्याबद्दल पुनावळे ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. अशी माहिती भाजपचे शहर जिल्हा सचिव नवनाथ मारुती ढवळे यांनी दिली.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!