शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका अर्चना तापकीर यांच्या नवीन जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा लोकप्रिय आमदार शंकर जगताप यांच्या शुभहस्ते अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्याला परिसरातील नागरिक, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शुभेच्छांचा वर्षाव केला.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना जनतेशी सातत्याने संपर्क ठेवून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी जनसंपर्क कार्यालय महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. नागरिकांनी दाखविलेला विश्वास आणि प्रेम हे अधिक जोमाने जनसेवा करण्याची प्रेरणा देणारे असल्याची भावना अर्चना तापकीर यांनी व्यक्त केली.
या उद्घाटन सोहळ्यास ज्ञानेश्वर तापकीर, स्थायी समिती सभापती अभिषेक दादा बारणे, नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, विनोदभाऊ नढे, नगरसेविका सविताताई खुळे, नीताताई पाडाळे, कोमलताई काळे, संतोष दादा कलाटे, प्रशांत विनोदे, संदीपभाऊ गाडे, प्रवीणभाऊ वाघमोडे, राहुलभाऊ दुधाळे, सोमनाथ दादा तापकीर, सनीदादा बारणे, आयुषदादा निंबारकर, आदेश नखाते, राजेंद्र पवार, विनोद नखाते, संजय भोसले, अभिषेक वाळके, हनुमंत पिसाळ, विशाल माळी, निलेशभाऊ तापकीर, निलेशभाऊ तापकीर युवा मंच, विनोदभाऊ तापकीर मित्र परिवार, कमलताई कांबळे, रेखाताई काटे, सुजाताताई ढोपे, अरुणाताई शिंदे, अनिताताई चोपडे, रक्षाताई पाटील, राजश्रीताई शुक्ला, सिमाताई आव्हाळे, सुरेखाताई पाठक, शर्मिला गावडे, दीपाताई पाटील यांच्यासह असंख्य नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी अर्चना तापकीर यांना पुढील जनसेवेसाठी शुभेच्छा देत, नव्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या अधिक प्रभावीपणे सोडविल्या जातील, असा विश्वास व्यक्त केला. उद्घाटनानंतर उपस्थितांनी नव्या कार्यालयाला भेट देऊन शुभेच्छा दिल्या. संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.



