spot_img
spot_img
spot_img
spot_img

रहाटणी, पिंपळे सौदागर येथे नवीन आयुर्वेद ओपीडीचा होणार शुभारंभ; नागरिकांना तज्ज्ञ आरोग्य सेवा उपलब्ध

शबनम न्यूज | प्रतिनिधी

 डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, पिंपरी आणि नाना काटे सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रहाटणी, पिंपळे सौदागर येथे नवीन ओपीडी सेवेचा शुभारंभ शनिवार, दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात येणार आहे.

ही ओपीडी श्री स्वामी समर्थ केंद्र, रॉयल एनफिल्ड शोरूमच्या बाजूला, नाना काटे कार्यालयासमोर, रहाटणी चौक येथे सुरू होणार असून परिसरातील नागरिकांना दर्जेदार आणि सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.

या ओपीडीमध्ये जनरल फिजिशियन (सामान्य वैद्यकीय तपासणी), स्त्रीरोग व प्रसूती विभाग, पंचकर्म उपचार, शस्त्रक्रिया विभाग तसेच व्यसनमुक्ती समुपदेशन व उपचार अशा विविध आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली परवडणाऱ्या दरात उपचाराची सुविधा नागरिकांना मिळणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

उद्घाटन सोहळ्यास विविध मान्यवर उपस्थित राहणार असून रहाटणी व परिसरातील नागरिकांनी या नव्या आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद हॉस्पिटल व रिसर्च सेंटर आणि नाना काटे सोशल फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!