spot_img
spot_img
spot_img
spot_img

शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या गुरूंचा गुरुपौर्णिमेनिमित्त महापालिकेकडून गौरव

शबनम न्यूज | प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेतील यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण समितीच्या सभापती रविना आंगोळकर यांच्या हस्ते करण्यात आला.

गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला नगरसदस्या प्रियांका कुदळे, योगिता बारणे, सारिका बोऱ्हाडे, कविता भोंगाळे, शिक्षण विभागाच्या उपायुक्त ममता शिंदे, प्रशासन अधिकारी संगीता बांगर, पर्यवेक्षिका सुनीता गिते, खालेदा खान, मुख्याध्यापक पांडुरंग मुडगुण आदी उपस्थित होते.

पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी नुकत्याच घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या समृद्धी ताठे, यशपाल चव्हाण, स्वरा थोरे, प्रीती गव्हाणे, आरोही शुक्ला, दुर्वा चौगले, मनस्वी तडमे, काव्या पाटील या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. तर आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत समीक्षा पानसकर, आराध्या वळवे, आदित यादव, अनुष्का खरात या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे विकास साकत, पूजा इंगळे, शीतल म्हेत्रे, वसंत मुठे, रुपाली घोडेकर, शंकर भवारी, नामदेव चव्हाण, जितेंद्र कऱ्हाड, उमेश सूर्यवंशी व सुनिता दिंडे या शिक्षकांचा सन्मान सभापती रविना आंगोळकर यांच्या हस्ते करण्यात आला.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!