पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब
पिंपरी पोलिसांनी रमाबाई नगर परिसरातील एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर छापा टाकून सात जणांविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत ₹४३,४७० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विनापरवाना पैशांवर ‘तीन पत्ती’ हा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर छापा टाकण्यात आला. कारवाईदरम्यान ₹८,०२० रोख रक्कम, सुमारे ₹१३,००० किमतीचे पाच मोबाईल, तसेच जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी सातही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.




Total Users : 226804