पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
दापोडी पोलिसांनी कासारवाडी परिसरात कारवाई करत तडीपार असलेल्या एका सराईत आरोपीला कोयत्यासह ताब्यात घेतले. आरोपीने हद्दपारी आदेशाचे उल्लंघन करत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत प्रवेश केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरशद हनिफ सय्यद (वय २६, रा. कासारवाडी) याला गंधर्व गरिमा लॉन्सच्या पाठीमागील रस्त्यावर संशयास्पदरीत्या फिरताना पकडण्यात आले. झडतीदरम्यान त्याच्याकडून बेकायदेशीरपणे बाळगलेला लोखंडी कोयता जप्त करण्यात आला.
आरोपीला यापूर्वी महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये सहा महिन्यांसाठी पिंपरी-चिंचवड, पुणे शहर आणि पुणे ग्रामीण पोलीस हद्दीतून तडीपार करण्यात आले होते. तसेच आयुक्तालय क्षेत्रात घातक शस्त्रे बाळगण्यास मनाई असतानाही त्याने कोयता जवळ बाळगून आदेशाचा भंग केल्याने त्याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास दापोडी पोलीस करीत आहेत.




Total Users : 226812