पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
सायबर फसवणुकीसाठी बँक खाते उपलब्ध करून देत त्यातून एटीएमद्वारे रक्कम काढल्याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी बीड जिल्ह्यातील माणिक व्यंकट भातने याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भारतीय न्याय संहिता कलम ११२(२), ६१(२), ३१७(२), ३१८(४) व ३(५) अन्वये कारवाई करण्यात आली असून आरोपी अद्याप फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने स्वतःच्या इंडियन ओव्हरसीज बँकेच्या खात्याचा वापर संघटित सायबर गुन्हेगारीसाठी करून दिला. कर्नाटकातील कोलार ग्रामीण येथे दाखल एनसीसीआरपी तक्रारीतील ₹८० हजारांच्या फसवणुकीपैकी ₹१० हजारांची रक्कम तळेगाव दाभाडे येथील एटीएममधून काढण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघुळे करीत आहेत.



