spot_img
spot_img
spot_img

प्रभाग १९ मध्ये मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न; १५९ युनिट रक्तसंकलन!

शबनम न्यूज | प्रतिनिधी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवडमधील प्रभाग १९ मध्ये एका भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पिंपरी चिंचवड मनपाचे नगरसेवक तथा सखी सोबती फाऊंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष श्री. शितल उर्फ विजय गोरख शिंदे यांनी या सामाजिक उपक्रमाचे प्रमुख आयोजन केले होते. प्रभाग क्रमांक १९ मधील भाजप पदाधिकारी, नागरिक, बंधू-भगिनी आणि मित्र परिवार यांच्या वतीने हे शिबिर पार पडले.

रविवार रोजी श्रद्धा रेजिडेन्सी, पारस भवन जवळ, उद्योग नगर, चिंचवड येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. विधान परिषदेचे आमदार मा. श्री. अमितजी गोरखे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शिबिराचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.

या शिबिराला नागरिकांचा आणि तरुणांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. आरोग्याची कोणतीही तडजोड न करता, वैद्यकीय मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करत अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात हे शिबिर पार पडले. एकाच दिवसात तब्बल १५९ रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले सामाजिक कर्तव्य उत्साहात पार पाडले आणि “रक्तदान हेच सर्वश्रेठ दान” हा संदेश प्रत्यक्षात आणला.

याप्रसंगी ब प्रभाग अध्यक्ष मंदार देशपांडे, स्थायी समिती सदस्या मधुरा नेताजी शिंदे, महेशजी कुलकर्णी, राजू दुर्गे, संजीवनी पांडे (महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव), शोभा भराडे, मोहन शिंपी सोसायटीचे चेअरमन, पवन गेरेजा, अमोल गुरव (चेअरमन), सचिन भुतडा, आशिष थोरवे, तेजस काशी, मिलिंद कुलकर्णी, तुषार अहिरराव यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“रक्तदान हे केवळ दान नसून एखाद्याला नवजीवन देण्याचे पुण्यकार्य आहे,” हा विचार या उपक्रमामुळे खरा ठरला. आजच्या धकाधकीच्या युगात रक्ताची टंचाई दूर करण्यासाठी अशा उपक्रमांची समाजात अत्यंत गरज असते. या शिबिराने सामाजिक बांधिलकीचा एक सुंदर आदर्श निर्माण केला असून, या मोठ्या यशामुळे आयोजकांनी सर्व रक्तदात्यांचे आणि उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!