spot_img
spot_img
spot_img

उद्योग संधी विषयी जागरूक राहिले पाहिजे – शरद राठी

शबनम न्यूज | प्रतिनिधी

विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि उद्योग विश्वातील संधी याविषयी जागरूक राहिले पाहिजे. तसेच सातत्याने कौशल्य विकास करत नव तंत्रज्ञानाशी जुळवून घ्यायला शिकले पाहिजे असे मार्गदर्शन सायबर सिक्युरिटी अँड आयटी ॲसेट मॅनेजमेंट प्रॉडक्ट स्टार्ट अप चे इंडिया हेड शरद राठी यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठ येथे अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विद्यालय अंतर्गत संगणक अभियांत्रिकी विभागात एसवाय. बी.टेक. सीएसई इंडक्शन २०२६ सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी पीसीयू कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे, तंत्रज्ञान विद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. व्ही. पाटील, संगणक विभागाचे संचालक डॉ. अभिजित बनुबाकोडे, संगणक विभाग प्रमुख डॉ. पल्लवी अहिरे, पीसीयू संचालक आउटरीच अँड ॲडमिशन्स डॉ. रामदास बिरादार, प्राध्यापक, विद्यार्थी व कर्मचारी आदी उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे यांनी विद्यापीठातील शैक्षणिक प्रक्रिया, परीक्षा पद्धती, इआरपी प्रणाली, इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन कौन्सिल, रेड हॅट अकॅडमी, परदेशी भाषा शिक्षणाच्या संधी, विविध विद्यार्थी क्लब्स व चॅप्टर्स, पीटीजी, आंतरराष्ट्रीय सहकार्य, इंटर्नशिप, प्लेसमेंट सहाय्य आणि विद्यार्थी केंद्रित उपक्रमांची माहिती दिली. निखिलेश मांकर यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व पीसीयू कुलपती हर्षवर्धन पाटील, व्यवस्थापन समितीचे सदस्य नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई आणि कुलगुरू संतोष सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!