spot_img
spot_img
spot_img

नॉव्हेल इंटरनॅशनल शाळेचा दहावीचा निकाल – शंभर टक्के यशाची परंपरा कायम!

शबनम न्यूज | प्रतिनिधी

नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूल चा  २०२५-२६ वर्षातील CBSE परीक्षेचा इयत्ता १० वीचा निकाल यावर्षीही अत्यंत उल्लेखनीय लागला असून शाळेने पुन्हा एकदा १०० % निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे संपूर्ण शाळेत आनंदाचे वातावरण पसरले आहे. यावर्षी शाळेचे एकूण १४३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते आणि सर्वांनी यशस्वी कामगिरी करत शाळेच्या यशाची पताका उंचावली. विद्यार्थ्यांची मेहनत, पालकांचे सहकार्य आणि शिक्षकांचे समर्पण यामुळेच हा उत्कृष्ट निकाल शक्य झाला आहे.

शाळेतील गुणवंतांमध्ये राज वैद्य याने ९८.६ टक्के मिळवून पहिला क्रमांक पटकावला. तसेच कु.  सलोनी पुजारी हिने ९५.2 टक्के मिळवून द्वितीय क्रमांक तर, वैष्णवी राठोड आणि सोनम शिंदे यांनी ९५ गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला.

निकालाचा एकूण आढावा खालीलप्रमाणे:

९१% पेक्षा अधिक गुण – २१ विद्यार्थी

८१% पेक्षा अधिक – ५६ विद्यार्थी

७१ % पेक्षा अधिक – ४२ विद्यार्थी

६१% पेक्षा अधिक – 20  विद्यार्थी

५१% पेक्षा अधिक – ०४ विद्यार्थी

शाळेचे संस्थापक अध्यक्ष माननीय आमदार अमित गोरखे, संस्थेचे कार्यकारी संचालक श्री. विलास जेऊरकर, शाळा व्यवस्थापक डॉ. प्रिया गोरखे,तांत्रिक विभाग प्रमुख श्री.समीर जेऊरकर आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मृदुला गायकवाड, उप मुख्याध्यापिका सौ. वैशाली हरुगडे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे व पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्या म्हणाल्या, “हा निकाल केवळ शाळेचा नाही, तर प्रत्येक शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्या सामूहिक प्रयत्नांचा परिणाम आहे.” नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूलने पुन्हा एकदा आपल्या शैक्षणिक गुणवत्ता, शिस्तबद्धता आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर दिलेल्या भराचे उत्तम उदाहरण समाजासमोर सादर केले आहे.

एकूणच शाळेचा हा निकाल विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून शाळेच्या शैक्षणिक दर्जाचा ठसा अधिक ठळकपणे उमटवणारा आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!