spot_img
spot_img
spot_img

चाकणमध्ये एटीएममधून ₹१०.०६ लाखांची उचल; सायबर फसवणुकीतील अज्ञात आरोपींवर गुन्हा

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब

चाकण दक्षिण पोलिसांनी सायबर फसवणुकीतून मिळालेली रक्कम एटीएममधून काढल्याप्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बालाजीनगर, मेदनकरवाडी आणि नाणेकरवाडी परिसरातील एटीएममधून सुमारे ₹१० लाख ६ हजारांची रक्कम काढण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून सायबर फसवणुकीतून प्राप्त झालेली रक्कम विविध एटीएममधून काढून शासनासह तक्रारदारांची फसवणूक केली. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३१९(२), ६१(२), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६६सी व ६६डी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोळंके करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!