spot_img
spot_img
spot_img

नेरे येथे बांधकाम मजुराचा निर्घृण खून; हात-पाय वायरने बांधून विहिरीत फेकले, एकाला अटक

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब

मुळशी तालुक्यातील नेरे येथील मेमाणे वस्ती परिसरात बांधकामावर काम करणाऱ्या मजुराचा निर्घृण खून करून त्याचा मृतदेह हात-पाय व कमरेला वायर बांधून विहिरीत फेकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी संतू ऊर्फ विशाल बासुदेव मांजी (वय २२, मूळ रा. नादिया, पश्चिम बंगाल) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत सुमन पात्रा (मूळ रा. नादिया, पश्चिम बंगाल) हा नेरे येथील बांधकाम साईटवर काम करत होता. २२ जुलै रोजी सकाळी ११ वाजण्यापूर्वी त्याच्या डोक्यावर व कपाळावर वार करून खून करण्यात आला. त्यानंतर मृतदेहाचे हात-पाय व कमरेला वायर बांधून विहिरीत फेकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या प्रकरणी रामदास पांडुरंग मेमाणे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, बीएनएस कलम १०३(१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!