spot_img
spot_img
spot_img

पिंपळे गुरवमध्ये इमारतीसमोरून होंडा युनिकॉर्न चोरी; ४० हजारांच्या दुचाकीवर चोरट्यांचा डल्ला

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब

पिंपळे गुरव येथील सुवर्णयुग कॉलनी परिसरात इमारतीसमोर पार्क केलेली ४० हजार रुपये किमतीची होंडा युनिकॉर्न दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० जुलै रोजी सायंकाळी ८ ते २१ जुलै रोजी सकाळी ७ या कालावधीत अशोक विहार शेजारील इमारतीच्या पार्किंगमधून एमएच-१४-जेडी-२४३४ क्रमांकाची काळ्या रंगाची २०२० मॉडेल होंडा युनिकॉर्न दुचाकी चोरीला गेली.

याप्रकरणी प्रशांत खेमा वडेकर (रा. पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू असून पुढील तपास सांगवी पोलीस करत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!