spot_img
spot_img
spot_img
spot_img

काळेवाडी कचरा संकलन केंद्राची स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्याकडून पाहणी

शबनम न्यूज | प्रतिनिधी

“स्वच्छ शहर, सक्षम नियोजन आणि पर्यावरणपूरक भविष्य – हीच आपली दिशा!” या धोरणाला प्रत्यक्षात आणण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने जोरदार पावले उचलली जात आहेत. याचाच एक भाग म्हणून, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी आज काळेवाडी येथील एम.एम. कॉलेजजवळील कचरा संकलन केंद्राला थेट भेट दिली आणि तेथील संपूर्ण कामकाजाची पाहणी केली.
या पाहणीदरम्यान सभापतींनी कचरा व्यवस्थापनाच्या प्रत्येक टप्प्याची सविस्तर माहिती घेतली. शहरातून गोळा होणारा ओला व सुका कचरा कशा पद्धतीने गोळा केला जातो, केंद्रावर त्याचे वर्गीकरण कसे होते आणि त्यावर वैज्ञानिक पद्धतीने प्रक्रिया करून विल्हेवाट कशी लावली जाते, याचा आढावा त्यांनी घेतला. तसेच, कचरा संकलन केंद्राचा परिसर आणि आजूबाजूच्या भागात उत्तम स्वच्छता राखली जावी, यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवर्जून सूचना दिल्या.
शहराचा विस्तार वेगाने होत असून आगामी काळात लोकसंख्या आणखी वाढणार आहे, त्यामुळे निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाणही वाढणार आहे. ही भविष्यातील गरज लक्षात घेऊन आतापासूनच घनकचरा व्यवस्थापनाचे अधिक सक्षम आणि दूरगामी नियोजन करावे, असे स्पष्ट निर्देश सभापती अभिषेक बारणे यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले. कचरा प्रक्रिया करणारी यंत्रणा अधिकाधिक गतिमान व प्रभावी ठेवण्यावर महापालिकेचा भर असल्याचे त्यांनी सांगितले.

या दौऱ्यामुळे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कामकाजाला अधिक गती मिळणार असून, थेरगाव आणि काळेवाडी परिसरातील नागरिकांना स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी वातावरण मिळण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

– अभिषेक बारणे, सभापती, स्थायी समिती, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!