spot_img
spot_img
spot_img
spot_img

क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाचे पुणे शाखेच्या वतीने गुणवत्ता व्यवस्थापन कन्वेंशन २०२६ उत्साहात

शबनम न्यूज | प्रतिनिधी

विविध उद्योग संस्थेतील उत्पादने, सेवा आणि प्रक्रियांच्या गुणवत्तेत सातत्याने सुधारणा करून ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या उद्देशाने क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया पुणे शाखेच्या वतीने गुणवत्ता व्यवस्थापन कन्वेंशन २०२६ चे आयोजन करण्यात आले होते. ते
भोसरी येथील एक्सलन्स सेंटर येथे पार पडले .
या स्पर्धेत ३८ संस्थांमधील एकूण ४८१ सहभागी सहभागी झाले होते. केस स्टडी, स्लोगन आणि पोस्टर या तीन गटांमध्ये एकूण १९५ नामांकने प्राप्त झाली होती. सहभागी उद्योगसंस्थांच्या सदस्यांनी विविध गटांमध्ये झालेल्या स्पर्धेत आपले कौशल्याचे सादरीकरण सादर केले.
कन्वेंशन कार्यक्रमाचे उद्घाटन बॉश चेसिस सिस्टीम्स इंडिया कंपनीचे वरिष्ठ पदाधिकारी जगदीप सिंग बिरदी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. तर समारोप सत्रासाठी प्रमुख पाहुणे म्हणून एस के एफ इंडिया इंडस्ट्रियलचे वरिष्ठ अधिकारी प्रमोद कुलकर्णी व आदी मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेत सहभागी संघातील विजेत्या स्पर्धक संघांना गुणवत्तेच्या आधारावर सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक स्मृतीचिन्ह स्वरूपात प्रदान करण्यात आले. यावेळी क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष सतीश काळोखे तसेच पुणे शाखा परिषद सदस्य माधव बोरवणकर, पवनकुमार रौंदळ, धनंजय वाघोलीकर आणि परवीन तरफदार हे उपस्थित होते.
स्पर्धेत केस स्टडीचे सादरीकरणाचे मूल्यमापन अजय अंबिके, प्रभाकर चोपडे, ऋतू मेहता, धनंजय वाघोळीकर, पंकज बडगुजर, पवन गुजराती, संजय लकडे, चंद्रशेखर बापट, प्रशांत मुधळवाडकर, व्यंकटेश राव, विठ्ठल वाघचौरे, पवनकुमार रौंदळ आणि माधव बोरवणकर यांनी केले. तर स्लोगण आणि पोस्टर गटांचे मूल्यमापन राहुल गुरुळे आणि ललिता परदेशी यांनी केले.

संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विजया रुमाले यांनी केले . रहीम मिर्झा बेग, प्रशांत बोराटे आणि चंद्रशेखर रुमाले यांनी यशस्वीरित्या आयोजित केला. . गुणवत्ता व्यवस्थापनाच्या माध्यमातून विविध उद्योगांनी अधिक पुढाकार घ्यावा यासाठी क्वॉलिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया पुणे शाखेचा हा उपक्रम महत्त्वाचा ठरला. सहभागी संस्थांनी आपले नावीन्यपूर्ण प्रकल्प सादर करून गुणवत्ता संस्कृती वाढविण्याचा संकल्प व्यक्त केला.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!