शबनम न्यूज | प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, लोकाभिमुख नेतृत्वाचे प्रतीक आणि जनतेच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या चिखली पोलीस ठाण्यात अत्यंत भावपूर्ण वातावरणात अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी कृतज्ञतेने आदरांजली वाहिली.
या प्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत जाधव, सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे, सिद्धनाथ बाबर, पोलीस अंमलदार भांबुरे, लोहकरे मॅडम यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मारुती जाधव, सोमनाथ शेळके, तुषार सोनवणे आणि संग्राम पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात उपस्थितांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या समाजाभिमुख नेतृत्वाचा, सर्वसामान्य नागरिकांप्रती असलेल्या संवेदनशीलतेचा आणि लोकहितासाठी केलेल्या कार्याचा गौरवपूर्ण शब्दांत स्मरण केला. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय आणि विकास पोहोचविण्याचा त्यांचा ध्यास आजही अनेकांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
यावेळी उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन केले. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध, सन्मानपूर्वक आणि भावनिक वातावरणात पार पडला.
यावेळी उपस्थितांनी, “नेते काळाच्या पडद्याआड जातात; मात्र त्यांच्या विचारांची, कार्याची आणि जनतेच्या मनात निर्माण झालेल्या विश्वासाची परंपरा कायम प्रेरणा देत राहते,” अशा शब्दांत स्वर्गीय अजितदादा पवार यांना कृतज्ञ अभिवादन केले.



