spot_img
spot_img
spot_img

मोशीत किरकोळ कारणावरून दांडक्याने हल्ला; व्यावसायिकाचा अंगठा फ्रॅक्चर, तिघांवर गुन्हा

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब

मोशी येथील स्पाईन रोड परिसरात कार चालवण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान थेट मारहाणीत झाले. लाकडी दांडक्याने हल्ला करून व्यावसायिकाचा अंगठा फ्रॅक्चर केल्याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुणाल भास्कर तोडकर (वय ४३) हे त्यांच्या १४ वर्षीय मुलगा देवांशसोबत कल्चर क्रिस्ट सोसायटी परिसरात फेरफटका मारत होते. यावेळी एका कारचालकाने कोणताही इशारा न देता कार अचानक त्यांच्या समोर वळवली. याबाबत जाब विचारल्याचा राग मनात धरून आरोपींनी सोसायटीच्या गेटजवळ कार थांबवली. त्यानंतर शिवीगाळ करत कारमधून लाकडी दांडका काढून फिर्यादीवर हल्ला केला. या मारहाणीत फिर्यादी यांच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाले. तसेच इतर आरोपींनी धक्काबुक्की करून घटनास्थळावरून पळ काढला.

या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात राजू सुभाष येदे, गोविंद कांबळे आणि गौरव शर्मा यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११५(२), ११८(१), ११८(२), ३५२ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!