पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब
सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत एका निवृत्त नागरिकाकडून ९ लाख रुपये उकळल्याप्रकरणी सांगवी पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मारुती मुकींदा शिकरे (वय ६५, रा. पिंपळे गुरव) यांचे जावई यांना सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन आरोपी संजय श्रीरंग सोनोने याने २०२४ मध्ये दिले. त्यासाठी टप्प्याटप्प्याने ९ लाख रुपये स्वीकारले. मात्र, कोणतीही नोकरी न लावता तसेच घेतलेली रक्कम परत न करता फिर्यादीची फसवणूक करून विश्वासघात केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१६(२) व ३१८(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.




Total Users : 226830