spot_img
spot_img
spot_img
spot_img

चिंचवडमध्ये मालमत्तेच्या वादातून महिलेवर दगडाने हल्ला; दाम्पत्याविरुद्ध गुन्हा

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब

चिंचवड येथील विद्यानगर परिसरात मालमत्तेच्या वादातून एका महिलेला मारहाण करून दगडाने जखमी केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मनीषा भारत जाधव (वय ४४, रा. गंजपेठ, पुणे) या त्यांच्या वडिलांच्या घरी गेल्या असता, तेथे राहणारी त्यांची बहीण पल्लवी दत्ता भोसले आणि तिचा पती दत्ता दिगंबर भोसले यांनी मालमत्तेच्या वादातून “तू इथे का आली?” असे म्हणत शिवीगाळ केली. त्यानंतर दोघांनी हाताने मारहाण करत पुन्हा येथे आल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. यावेळी पल्लवी भोसले हिने घरासमोरील दगड उचलून फिर्यादीच्या डाव्या हातावर मारल्याने त्या जखमी झाल्या.

या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ११५(२), ३५२ व ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!