spot_img
spot_img
spot_img
spot_img

आळंदीत किरकोळ वादातून बांधकाम व्यावसायिकावर दगडाने हल्ला; एकाविरुद्ध गुन्हा

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब

आळंदी येथील भाजी मंडई शेजारी असलेल्या इंद्रायणी टॉवर परिसरात किरकोळ वादातून बांधकाम व्यावसायिकावर दगडाने हल्ला केल्याची घटना सोमवारी (दि. २०) सकाळी घडली. या प्रकरणी आळंदी पोलिसांनी एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रोहन नंदकुमार कुऱ्हाडे (वय ३७, रा. आळंदी) हे त्यांच्या बांधकामस्थळी असताना आरोपी महिला नौषाद सिकंदर पठाण हिने “येथे काम करायचे नाही” असे म्हणत वाद घालत शिवीगाळ केली. फिर्यादी समजावून सांगत असताना आरोपीने दगड उचलून त्यांच्या दिशेने फेकला. या हल्ल्यात फिर्यादी यांच्या डाव्या हाताच्या करंगळी व शेजारच्या बोटाला दुखापत झाली.

या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक पवार पुढील तपास करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!