spot_img
spot_img
spot_img

सायबर फसवणुकीसाठी बँक खाते उपलब्ध करून दिल्याप्रकरणी एकावर गुन्हा; दोन नागरिकांची १९ हजारांची फसवणूक

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब

सायबर फसवणुकीसाठी स्वतःच्या नावाचे बँक खाते उपलब्ध करून देत आर्थिक व्यवहार केल्याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या खात्याद्वारे देशातील दोन नागरिकांची एकूण १९ हजार १०० रुपयांची फसवणूक झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अक्षय हेमंत गायकवाड (वय ३३, रा. पिंपरी गाव) याने कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेतील स्वतःच्या नावावरील खात्याचा वापर साथीदारांच्या संगनमताने सायबर फसवणुकीसाठी केला. संबंधित खात्यात फसवणुकीची रक्कम जमा झाल्याचे तपासात उघड झाले.

याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेचे कलम ३१८(४), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायदा कलम ६६-डी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!