spot_img
spot_img
spot_img

रावेत–नऱ्हे एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या कामाला लवकर सुरुवात – शंकर जगताप

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड आणि हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आमदार शंकर जगताप यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. रावेत ते नऱ्हे या 32 किलोमीटरच्या एलिव्हेटेड कॉरिडॉरसाठी सुमारे सहा हजार कोटी रुपयांच्या सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) मंजूर केला असून लवकरच या कामाला सुरुवात होणार असल्याचे  केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले असल्याची माहिती आमदार जगताप यांनी शनिवारी  दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि 18) पुणे येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमवेत पुणे-शिरुर उन्नत द्रुतगती महामार्ग, तळेगाव-चाकण-शिक्रापूर उन्नत महामार्ग आणि हडपसर-यवत उन्नत महामार्गांचे भूमिपूजन केले यावेळी या कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली.

 आमदार शंकर जगताप याबाबत म्हणाले,
पुणे–बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वाढती वाहतूक, हिंजवडी आयटी पार्ककडे जाणाऱ्या वाहनांची संख्या आणि पिंपरी-चिंचवड शहराचा वेगाने होणारा विस्तार यामुळे रावेत ते नऱ्हे हा एलिव्हेटेड कॉरिडॉर तातडीने मंजूर करावा, अशी आग्रही मागणी   23 मार्च 2026 रोजी हिवाळी अधिवेशनात केली होती. तसेच राज्य आणि केंद्र सरकारकडे या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. आज या कामावर शिक्कामोर्तब झाले असून लवकरच कामाला सुरुवात होईल. यातून वाहतूक सक्षमीकरणाच्या  दृष्टीने पिंपरी चिंचवडकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या रस्त्यामुळे  वाकड, ताथवडे, पुनावळे, रावेत, किवळे तसेच बालेवाडी, बाणेर, सुस आणि बावधन परिसरातील वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार आहे. हिंजवडी आयटी पार्ककडे ये-जा करणाऱ्या वाहनांचा प्रवास अधिक गतिमान होऊन दैनंदिन वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. याशिवाय माण, मारुंजी, नेरे, जांबे आणि कासारसाई परिसरातील नागरिकांनाही या प्रकल्पाचा थेट लाभ मिळेल. मुंबई–बंगळूर महामार्गावरील वाहनांचा वेग वाढण्याबरोबरच प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार असल्याचा विश्वास आमदार जगताप यांनी व्यक्त केला  आहे.

राज्य आणि केंद्र सरकारच्या समन्वयातून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रत्यक्षात येत आहे. आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून कॉरिडॉरच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याचे आमदार जगताप यांनी सांगितले.

“पिंपरी-चिंचवड आणि हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न अधिवेशनात ठामपणे मांडला होता. त्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला. या प्रयत्नांना यश मिळाले असून रावेत–नऱ्हे एलिव्हेटेड कॉरिडॉर शहराच्या भविष्यातील सक्षम वाहतूक व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग ठरेल.”  

— शंकर जगताप,
 आमदार, चिंचवड विधानसभा मतदारसंघ.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!