पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब
पिंपळे सौदागर परिसरातील एका घरात केअरटेकर म्हणून काम करणाऱ्या तरुणाने विश्वासघात करत लाखो रुपयांचे दागिने व रोकड चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सांगवी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३५१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दि. १६ जुलै २०२६ रोजी रात्री ९.१७ वाजता नोंदविण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे सौदागर येथील डॅफोडाईल्स हाऊसिंग सोसायटी, ए-१, फ्लॅट क्रमांक ३०३ येथे फिर्यादी महिला आपल्या आई-वडिलांसोबत राहतात. मार्च २०२६ पासून १९ जून २०२६ दरम्यान केअरटेकर म्हणून काम करणाऱ्या पारस यादव (वय ३०, रा. रहाटणी, पुणे) याने घरातील सुमारे २ लाख २२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम फिर्यादींच्या परवानगीशिवाय लबाडीने चोरून नेल्याचा आरोप आहे.
तक्रारीनंतर सांगवी पोलिसांनी तपास सुरू करून आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.
स्थानिक परिसरात या घटनेमुळे खळबळ उडाली असून घरगुती मदतनीस व केअरटेकर ठेवताना नागरिकांनी आवश्यक पडताळणी करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.


