मावळ | प्रतिनिधी : युनूस खतीब
मावळ तालुक्यातील कुसगाव गावठाण परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून ९ जणांविरुद्ध कारवाई केली आहे. या कारवाईत रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.
शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १८७/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १५ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे ९.४० वाजता कुसगाव गावठाण येथील एकता मित्र मंडळाच्या पत्र्याच्या शेडमध्ये काही व्यक्ती ‘फ्लॅश’ नावाचा पत्त्यांचा जुगार पैशांची हारजित लावून खेळत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला.
कारवाईदरम्यान आरोपींकडून पत्त्यांचा संच आणि रोख रक्कम असा एकूण ३,४७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी आकाश दत्तात्रय केदारी (२९), माधव रामभाऊ केदारी (५०), अतुल प्रताप जाधव (३९), आकाश अंकुश केदारी (३३), दत्तात्रय दामू केदारी (४५), गणेश बबन कावडे (३६), महेश अंकुश केदारी (२९), केतन विजय तनपुरे (३२) आणि सोमनाथ अंकुश केदारी (४२) या नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे केली असून पुढील तपास सुरू आहे. परिसरात बेकायदेशीर जुगार अड्ड्यांवर पोलिसांची कारवाई सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.


