शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी कचरा संकलन (डेपो)नाही तर अत्याधुनिक पद्धतीचे व दुर्गंधीमुक्त कचरा प्रक्रियाकेंद्र उभारण्यात येणार असल्याचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.
आज महापालिका सभेत मोशी येथील एकाच ठिकाणी संकलन (डेपो) व प्रक्रिया केंद्र असल्याने मोठ्या प्रमाणावर कचरा साठला आहे, त्यावर उपाययोजना करण्याबाबत चर्चा झाली. त्यावेळी बोलताना आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शहरात कचरा डेपो नाही तर आधुनिक स्वरूपातील प्रक्रिया केंद्रे उभारण्याचे ठरवले आहे, असे स्पष्ट केले.



