पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब
मोशी येथील एका गृहनिर्माण सोसायटीमधील बँकेच्या ताब्यात असलेल्या फ्लॅटचे सील व कुलूप तोडून बेकायदेशीररित्या प्रवेश केल्याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पाईन रोडवरील सेक्टर क्रमांक ६ मधील कल्पतरू क्रेस्ट सोसायटी येथे ही घटना ३ ते ६ जुलै दरम्यान घडली. बँकेने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून संबंधित मालमत्ता ताब्यात घेतल्यानंतर ती सील करण्यात आली होती.
मात्र आरोपी हरी दत्तात्रय शिंदे (वय अंदाजे ४६) व त्यांच्या पत्नीने फ्लॅटचे सील व दरवाज्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केल्याचा आरोप आहे. यावेळी बँकेने लावलेला अधिकृत बॅनरही फाडून नुकसान करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी विजय हरिभाऊ शिंदे (वय ३८) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३२९(४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.




Total Users : 226865