शबनम न्यूज | प्रतिनिधी
स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त थेरगाव परिसरातील सन २०२६ मध्ये दहावी आणि बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ माजी नगरसेविका मायाताई बारणे आणि माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. हा सत्कार समारंभ बुधवार, दि. २२ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत संतोष मंगल कार्यालय, संतोषनगर, थेरगाव येथे होणार आहे.
समारंभासाठी परिसरातील दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांनी आपली गुणपत्रिकेची झेरॉक्स प्रत दि. २० जुलै २०२६ पर्यंत जय गणेश नागरी सहकारी पतसंस्था व जनसेवा नागरी सहकारी पतसंस्था, संतोषनगर, थेरगाव येथे जमा करावी, असे आयोजकांनी आवाहन केले आहे. मुदतीनंतर आलेल्या गुणपत्रिकांचा विचार केला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या उपक्रमाचे आयोजन जय गणेश नागरी सहकारी पतसंस्थेचे सर्व संचालक, सल्लागार तसेच दैनंदिन प्रतिनिधी कर्मचारी वर्ग यांच्या वतीने करण्यात आले आहे. सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी मायाताई बारणे आणि संतोष बारणे यांचे विशेष मार्गदर्शन लाभत आहे.



