शबनम न्यूज | प्रतिनिधी
भाजे ( मळवली) येथील संपर्क बालग्राम संस्थेच्या परिसरात अतिवृष्टी मुळे दरड कोसळून मोठे नुकसान झाले या संस्थेत ६ ते १८ वर्षे वयोगटातील अनाथ मुली वास्तव्यात असून या आपत्तीमुळे त्यांच्या राहण्या बरोबरच जेवणाची ही मोठी अडचण निर्माण झाली होती. संस्थेने मदतीचे आवाहन केल्यानंतर इनरव्हील क्लब ऑफ मावळ शक्ती यांच्याकडून तातडीने मदतीचा हात पुढे करण्यात आला मावळ शक्ती कडून मुलांच्या जेवणासाठी १० किलो तांदूळ १० किलो गहू तसेच कोबी.. फ्लावर ..बटाटे.. कांदे… मिरची.. भोपळा.. दुधी भोपळा.. शिमला मिरची ..भेंडी.. व इतरही भाजीपाला देण्यात आला.
कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख मान्यवर मावळ शक्ती अध्यक्षा ज्योती राजिवडे ..सेक्रेटरी सुरैया शेख.. एडिटर छाया साळुंखे.. खजिनदार राजश्री नाईकरे ..क्लब मेंबर अश्विनी बेंद्रे.. जयश्री म्हसे कामगार नेते श्री. रवींद्र नाईकरे सामाजिक कार्यकर्ते श्री.भरत नाना राजिवडे संस्थेचे व्यवस्थापक श्री. सुभाष बोंगार्डे…. शिक्षिका सविता फंड… शिक्षिका रेश्मा गायकवाड …P R O नितू सिंग आधीक्षीका श्वेता घारे हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
मावळ शक्ती अध्यक्षा ज्योती राजिवडे यांनी आपल्या मनोगतात संस्थेला इथून पुढे कोणती मदत लागल्यास पुरेपूर मदत केली जाईल तसेच मुलींसाठी काही मेडिकल प्रॉब्लेम असतील तर ते ही प्रॉब्लेम क्लब मार्फत मदत केली जाईल असं शब्द संस्थेतील व्यवस्थापकांना दिला.
संस्थेची व्यवस्थापक माननीय श्री सुभाष बोंगार्डे यांनी आलेले सर्व मान्यवरांचे आभार मानले.


