spot_img
spot_img
spot_img

पिंपरी चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादितचा ५४ वा वर्धापन दिन सोमवारी (दि. १३ जुलै २०२६) संस्थेच्या कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. वर्धापन दिनानिमित्त सभासदांसाठी अल्पोपहार व चहापान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.

वर्धापन दिनाचे औचित्य साधून संचालक मंडळाची विशेष सभा घेण्यात आली. तसेच आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिराला नागरिक आणि सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष शशिकांत ऊर्फ बबनराव झिंगुर्डे यांनी संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेत सभासदांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. महापौर रवीभाऊ लांडगे यांचा वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला चेअरमन शिवाजी येळवंडे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे, सचिव विश्वनाथ लांडगे, खजिनदार अभिषेक फुगे यांच्यासह संचालक मंडळातील सनी कदम, नथा मातेरे, भास्कर फडतरे, चंद्रकांत भोईर, विजय नलावडे, अनिल लव्हन, विजय कांबळे, कृष्णा पारो, सदीप कापसे, योगेश रानवडे, विजय मुंडे, वैभव देवकर, विशाल भुजबळ, गणेश गवळी, युनुस पठाणीवाले, मनोज माठेरे, महादेव बोत्रे, दिगंबर चिंचवडे, धर्मेंद्र शिंदे, संजय कापसे, नंदकुमार इंदलकर, लाला गाडे, उमेश बांदल, मंगेश कलापुरे, विशाल बाणेकर, चंद्रशेखर गायकवाड, तुबार कसपटे, सूरज टिंगरे, दत्ता ढोरे, मदन चिंचवडे, किसान आरजे, प्रमोद अंबपकर, सुभाष ताकवले, भाऊसाहेब शेलार, किशोर आवाळा, गौतम पायाळ, गौतम भोयराव, राकेश चव्हाण तसेच माजी चेअरमन चारुशिला जोशी आणि नितीन समगीर आदी उपस्थित होते.

वर्धापन दिनानिमित्त अनेक सभासदांनी पतसंस्थेला भेट देत संस्थेच्या कार्याची प्रशंसा केली. सभासदांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचे, पारदर्शक कारभाराचे आणि सुयोग्य कामकाजाचे यावेळी विशेष कौतुक करण्यात आले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!