पुणे प्रतिनिधी शंकर जोग
संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी निमित्त आलेल्या वारकरी संप्रदायांना नाना पेठ येथे सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील दोन दिवस सुभद्रा सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने मोफत सलून सेवेचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी अनेक वारकऱ्यांनी दाढी कटिंग त्याचा लाभ घेतला
यावेळी सुभद्रा सामाजिक सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विलास लोंढे, संस्थेचे अध्यक्ष नितीन बालकी, इरफान सय्यद, शोएब शेख, विशाल आंदे, राजू फुलपाखर, प्रवीण फुलपगार, नासिर पठाण, जीवन गणपुरे, रत्नाकर खोब्रागडे, अंकुश बालकी, कलावंती तूपसौंदर, ॲड.छाया गायकवाड, जाहीदा शेख, ज्योती घोगरे, जुईली धोंडे, अरुणा पाटील, राहुल शेळके, प्रशांत दासा, विनोद जैन, सागर बुरा, आदी उपस्थित होते.
संस्थेच्या वतीने गेली दहा वर्षापासून वारकरी संप्रदायांना मोफत सलून सेवेचे आयोजन करण्यात येत आहे अशी माहिती सलून सेवेकरी नितीन बालकी यांनी दिली.


