पुणे प्रतिनिधी | शंकर जोग
जगदगुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांची पालखी पुण्याहून पंढरपूरकडे प्रस्थान होताना सोलापूर रोड मांजरी पुणे येथे वारकरी संप्रदायांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा पवार गटाच्या वतीने पुणे शहर उपाध्यक्ष प्रदीप पवार यांच्या हस्ते वारकऱ्यांना 100 किलो साबुदाणा खिचडी वाटप करण्यात आले. यावेळी प्रवीण पवार, प्रकाश दणाणे, व्यंकटेश दणाणे, शुभम दणाणे, गणेश बडेकर, व्यंकटेश केसवाल, जमीर शेख, अल्ताफ शेख, धनंजय हिरामठ, अकबर सरोटिया, राजू सावंत, किशोर मुरमे आदी उपस्थित होते.



