spot_img
spot_img
spot_img

चाकणमध्ये अंमली पदार्थांवर पोलिसांचा मोठा प्रहार; ८.२९ किलो गांजासह एक जेरबंद

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब

चाकण दक्षिण पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात धडक कारवाई करत ८.२९० किलो गांजा जप्त केला असून एका आरोपीला अटक केली आहे. जप्त केलेल्या गांजाची किंमत सुमारे ४ लाख १४ हजार ६०० रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

१० जुलै रोजी नाणेकरवाडी येथील जीएमपी ऑटो कंपनीच्या मागील मोकळ्या जागेत ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी दिलीप मधुकर शिंदे (रा. मेदनकरवाडी, ता. खेड) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला.

चौकशीदरम्यान हा गांजा समीर तडवी नावाच्या व्यक्तीकडून आणल्याची माहिती आरोपीने दिली. त्यानुसार समीर तडवी याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला असून तो सध्या फरार आहे. दोन्ही आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईमुळे चाकण परिसरातील अंमली पदार्थांच्या अवैध नेटवर्कवर मोठा आघात झाल्याचे मानले जात असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोते करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!